अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठणे कठीण, जाणून घ्या समीकरण

Pakistan Semi Final Chance World Cup 2023: 2023 चा एकदिवसीय विश्वचषक पाकिस्तानसाठी चांगला जाताना दिसत नाहीये. बाबर आझमच्या संघाला (Babar Azam) या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. सोमवारी चेन्नईत अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे बाबर आझमच्या संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, पाकिस्तानचा संघ अद्याप शर्यतीतून बाहेर पडलेला नाही.

पाकिस्तानने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात बाबरच्या संघाने नेदरलँड्सचा पराभव केला आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मात्र, यानंतर पाकिस्तानला भारत आणि नंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा संघही अफगाणिस्तानकडून पराभूत झाला आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याचा त्याचा मार्ग खडतर झाला आहे.

अशा प्रकारे बाबर सेना उपांत्य फेरी गाठू शकते
पाकिस्तान संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आणि पाच सामन्यांत दोन विजय मिळवून चार गुणांसह आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आपले उर्वरित चार साखळी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. पाकिस्तानला आता दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा सामना करायचा आहे. हे सर्व सामने बाबर आझमच्या संघासाठी करा या मरापेक्षा कमी नसतील.

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित चार सामने जिंकावे लागतील आणि तीन संघांपेक्षा जास्त संघ 14 गुण मिळवू शकणार नाहीत अशी आस लावून बसावे लागेल. म्हणजेच पाकिस्तानला आता इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. पाकिस्तान संघाने आपले उर्वरित चार सामने जिंकल्यास त्याचे एकूण 12 गुण होतील. यानंतर जर चार संघांचे 14 गुण झाले नाहीत तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो. मात्र, यामध्ये नेट रन रेट खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अशा स्थितीत पाकिस्तानला आता आगामी सामन्यांमध्ये निव्वळ धावगती सुधारावी लागणार आहे. सध्या बाबरच्या संघाचा नेट रन रेट -0.400 आहे.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ