सौदी अरेबियात रोबोटच्या लाजिरवाण्या कृत्यामुळे महिला रिपोर्टर अस्वस्थ, Video Viral

Saudi Robot Misbehaves With Reporter: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण कधी-कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सौदी अरेबियातील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये एक रोबोट महिला पत्रकारसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला पत्रकार एका कार्यक्रमात वार्तांकन करताना दिसेल. यावेळी, एक पुरुष रोबोट महिला रिपोर्टरच्या मागे उभा आहे. जणू काही महिला रिपोर्टर त्याच रोबोटबद्दल सांगत आहेत. पण नंतर काहीतरी घडते ज्यामुळे ती महिला रिपोर्टर अस्वस्थ होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रोबोट रिपोर्टर महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करतो, ज्यामुळे ती अस्वस्थ होते. यामागे काही तांत्रिक अडचण आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @historyinmemes नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘सौदी अरेबियाचा पहिला पुरुष रोबोट महिला रिपोर्टरला अयोग्यरित्या स्पर्श करताना दिसत आहे.’ या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करताना लिहिले, हे चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम केले गेले आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले, हे निश्चितपणे दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर