नवी दिल्ली – काल लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणा मुद्दा उपस्थित केला.कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची (Shinde gat) भूमिका होती. परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले. नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रियाताई यांनी उपस्थित केला.(The Shinde-Fadnavis government, which is cheating the Dhangar community, should clarify its position on reservation – Supriya Sule).
धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहे, असा आरोप सुप्रिता सुळे यांनी केला.त्यामुळे भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रियाताई यांनी लोकसभेत केली.
आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करत नसून ते तसेच राहिले पाहिजे. इतरांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, अशीच भूमिका आमच्या महाविकास आघाडीची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.