Shivajirao Adhalarao Patil | १० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका

Shivajirao Adhalarao Patil | आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी काल वाघोली दौरा केला. या दौऱ्यात आढळराव पाटलांनी नागरिकांच्या गाठीभेट घेत आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाघोलीमधील काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळरावाचं जंगी स्वागत केले. त्यानंतर आढळरावांनी ( Shivajirao Adhalarao Patil) नागरिकांशी संवाद साधत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत. १० वर्षापुर्वी वाघोली जेव्हा छोटी होती तेव्हा येथील पाण्यासाठी मनपाने एक योजना आखली होती. जीचा खर्च २५ कोटी होता. त्यापैकी निम्मा निधि मनपा देणार होती तर निम्मा खर्च वाघोली ग्रामपंचायतीला द्यावा लागणार होता. मी मंत्रालयात जाऊन यावर बोललो. मात्र खासदाराविना मतदारसंघ अशी मागच्या काही वर्षांपासून शिरुर मतदारसंघाची ओळख आहे. पुढे काय होणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे शहरातील ड्रेनेजच्या समस्यांवर फक्त अजितदादा तोडगा काढू शकतात. त्याबाबत अजित पवार यांच्याकडे तशी विनंती केली आहे. याचबरोबर पुण्यातील ट्राफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नसतानाही तीनवेळी गडकरी यांची भेट घेतली आहे. असं म्हणत वाघोलीतील समस्या त्याचवेळी सुटतील जेव्हा लोकांनी लोकांत मिसळणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे. असेही त्यांनी म्हटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन