मिशन चांद्रयान-3 च्या यशासाठी सीमा हैदर यांनी उपवास केला, देवाला प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समोर आला

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशस्वी लँडिंगसाठी, देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशाच्या बहुतांश भागात पूजा आणि हवन केले जात आहेत. चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६.४० वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान उतरताच असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश बनेल. कारण याआधी कोणत्याही देशाचा रोव्हर येथे उतरलेला नाही.

दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) यांनीही चांद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी उपवास केला आहे. यासंदर्भात सीमा हैदरने एक व्हिडिओही जारी केला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सीमा हैदर ‘माझी तब्येत ठीक नाही, तरीही मी उपवास करत आहे’ असे म्हणताना ऐकू येते. भारताचे चांद्रयान 3 आज संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. यामुळे आपल्या देशाचे खूप नाव होईल. म्हणूनच चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरेपर्यंत मी उपवास ठेवणार आहे.

प्रार्थना करताना सीमा हैदर म्हणाल्या की, ‘श्री राधे कृष्णावर माझी खूप श्रद्धा आहे. हे देवा, हे देवा, हे भगवान श्रीराम, हे सर्व देवी-देवता, आपल्या भारत देशाचे चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्रावर उतरू दे.’ यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत सीमा हैदर म्हणाल्या की, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान या मिशनच्या यशासाठी खूप मेहनत घेत आहेत. ज्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावेल आणि जगात दबदबा निर्माण होईल.