संपूर्ण देश सोनिया गांधींच्या पाठीशी असून हुकुमशाही के आगे कभी नही झूकेंगे – नाना पटोले

शिर्डी / मुंबई  – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Sonia Gandhi and Rahul Gandhi)  यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald)  प्रकरणासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता सोनिया आणि राहुल 8 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे. याबाबत बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करून हुकूमशाही निर्माण करू पाहणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली आहे. देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेली ईडीची कारवाई ही भाजपच्या किडक्या डोक्यातून निघालेली असून फक्त राजकीय द्वेषातून झाली आहे.

भाजपाने सात्यत्याने देशांमध्ये जाती-जाती, धर्म-धर्मामध्ये द्वेष (Hatred in religion) निर्माण केला आहे. देश विक्री करणा-या या सरकारने सुरूवातीपासून देशाची अस्मिता असलेल्या नेहरू-गांधी घराण्यावर टीका केलेली आहे. आठ वर्षापूर्वी संपलेले प्रकरण नवसंकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उकरून काढले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही फक्त राजकीय द्वेषातून झाली असून भाजपाच्या किडक्या डोक्यातून निघालेली ही आयडीया आहे. भाजपने कितीही कारवाया केल्या तरी त्यांच्या कारवायांना काँग्रेस कधीही घाबरणार नाही. संपूर्ण देश सोनिया गांधींच्या पाठीशी असून हुकुमशाही के आगे कभी नही झूकेंगे, देश के लिए आखरी दम तक लढेंगे, असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे.