अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा, गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सांगली – भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) करण्यात यावं अशी मागणी पडळकरांनी पत्रातून केली आहे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा असंही पडळकर पत्रात म्हणाले आहेत.

पडळकर म्हणाले,  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास अभिप्रित असेल की  शेकडो हिंदूचे जीव गेलेल्या मुंबई बॅाम्बब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या (Dawood Ibrahim, the mastermind of Mumbai Bomb Blast) बहिणीसोबतचे आर्थिक भागीदार नवाब मलिक (Nawab malik) यांचे पालनकर्ते मा.शरदचंद्र पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये  मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो?

जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे त्यासाठी मी  आपणास पत्र लिहीले आहे नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात  हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा.