श्री नागेश्वर मित्र मंडळाचे कार्य कौतूकास्पद – रमेश थोरात

दौंड ( सचिन आव्हाड) : पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाचे कार्य कौतूकास्पद असून, मंडळ चांगल्या पद्धतीने सामाजिक काम (social work) करत आहे. डान्स स्पर्धेच्या निमित्ताने मुलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. मुले इतक्या छान पद्धतीने नृत्य करू शकतात हे या स्पर्धेच्या निमित्ताने समजले. असे म्हणत सर्व विजेत्यांचे अभिनंदन माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी केले.

दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्ताने नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसह विविध उपक्रमांचे आयोजन ९ दिवस करण्यात आले होते. यातील विजेत्यांना दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना रमेश थोरात यांनी पाटस गावचे दिवंगत उपसरपंच आणि नागेश्वर मित्र मंडळाचे आधारस्तंभ मंगेश दोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. मंगेश दोशी हे सर्वांना मदत करण्यात पुढे असत. त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण रमेश थोरात यांनी करून दिली.

या कार्यक्रमावेळी पाटस गावच्या सरपंच अवंतिका शितोळे, माजी सभापती आशा शितोळे, तुषार थोरात, योगेंद्र शितोळे, प्रशांत शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सागर शितोळे पाटील, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, प्रवीण परदेशी, राजू शिंदे, पोपट गायकवाड, राहुल आव्हाड, गणेश चव्हाण, झाकीर तांबोळी, दीपक आव्हाड, लहू खाडे, गणेश रंधवे, प्रमोद कुरुंद, सीताराम भागवत, लाला लोखंडे यांसह मान्यवर उपस्थित होते.

नृत्य स्पर्धेतील विजेते स्पर्धक प्रथम क्रमांक काव्यांजली वाबळे, द्वितीय क्रमांक स्वरा वाबळे, तृतीय क्रमांक ओम शितोळे तर उत्तेजनार्थ बक्षीस अभय पंडित यांना देण्यात आले. रांगोळी स्पर्धा मोठा गटात प्रथम क्रमांक जागृती पाटील, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा शितोळे, तृतीय क्रमांक अक्षदा तवर, आणि उत्तेजनार्थ बक्षीस प्रिया ढमाले हिस देण्यात आले. रांगोळी स्पर्धा छोट्या गटात प्रथम क्रमांक राजवीर शितोळे, द्वितीय क्रमांक प्रांजली मोरे, तृतीय क्रमांक श्रेया वेदपाठक आणि उत्तेजनार्थ बक्षीस आर्या गायकवाड यांना देण्यात आले.