बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता – आदित्य ठाकरे

मुंबई : ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विरोध केला त्याच बाळासाहेबांना मित्राबरोबर (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) सोबत युती केल्याचा आनंदच झाला असता असा अजब दावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी केला आहे.

बाळासाहेब (Balasaheb)आणि पवार साहेबांची (Sharad Pawar) मैत्री ही तेव्हापासून होती. वर्षानुवर्षे होती. मला असं वाटतं की आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते. असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( SHIVSENAPRAMUKH BALASAHEB THACKAREY ) यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील ( MUMBAI UNIVERSITY ) दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आदित्य ठाकरे ( aditya thackeray ) यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते,

आज मोठे साहेब ( बाळासाहेब) असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता. कारण त्यांच्या मित्राबरोबर (शरद पवार) ( SHARAD PAWAR ) युती आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राला एकत्र नेण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.