Indapur Crime: इंदापूर हादरले; हॉटेलमध्ये मित्रांसह बसलेल्या एकाला गोळ्या झाडून संपवलं

Indapur Crime News: इंदापूरच्या शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते. ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?