‘प्रभु रामचंद्र विश्वव्यापी होता असं म्हणत 84व्या वर्षी पवारांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं हे नसे थोडके’

राम कुलकर्णी – शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) यांनी उद्याच्या 22 रोजी आयोध्येत होत असलेल्या प्रभु राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे (Ram Mandir Pranpratishta) ट्रस्टकडून आलेले पत्र स्विकारून दिलेल्या उत्तरात त्यांनी राम विश्वव्यापी असल्याचे म्हणत मंदिर बांधकाम पुर्ण झाल्यानंतर येणार असल्याचे प्रतिउत्तर दिले. स्वभावी नास्तिक असलेल्या पवारांनी 84 वर्षाच्या वयात राम विश्वव्यापी आहे असं म्हणत अस्तित्व मान्य केलं हेच ख­या अर्थाने सनातन हिंदु धर्मासाठी फार मोठे यश म्हणावे लागेल.

मंदिर बांधकाम पुर्ण झाले का नाही?याचे उत्तर पवारांना काँग्रेसवाले देवु शकतील पण प्राणप्रतिष्ठा गाभा­यात शंभर टक्के बांधकाम पुर्ण झाले असुन रंगरंगोटी चालणे म्हणजे अर्धवट बांधकाम म्हणता येणार नाही. खरं तर पवारांना देवदर्शनाची संधी चालुन आली होती पण केवळ मताच्या लाचारीसाठी मी रामाचा नाही हे दाखवण्याचा त्यांचा खटाटोप यातुन दिसतो.

उद्याच्या 22 रोजी आयोध्येत रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठापना होत असुन मंदिर ट्रस्टने देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवताना वेगवेगळ्या राजकिय पक्ष नेत्यांना देखील येण्यासाठी पत्र पाठवले. जसं की काँग्रेसमध्ये सोनिया गांधीसह मल्लिकार्जुन खरगे एवढेच नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लालुप्रसाद यादवासह देशातील सर्व मुख्यमंत्री, मंत्रीगणाला निमंत्रणे पाठवली. उद्देश हाच आहे की, ज्या भारतवासियांनी साडे चारशे वर्षाचा राम जन्मभुमीसाठी दिलेला लढा, अधुनमधुन केलेली कारसेवा आणि राम आयोध्येतच जन्मला पुराव्यासहित दाखल केल्यानंतर अखेर न्यायदेवतेलासुद्धा मान्य करावे लागले. कितीतरी वर्षाचे स्वप्न देशवासियांचे साकार होताना ज्यांनी संघर्षाचे साक्षीदार म्हणुन काम केले ते रामभक्त ख­या अर्थाने स्वर्गातुनसुद्धा उद्याच्या 22 रोजी सोहळ्याचे साक्षीदार झाल्याशिवाय रहाणार नाहीत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

प्रभु रामचंद्र एका दुसऱ्याचे नव्हते किंवा जातीपातीच्या राजकारणातले नव्हते सर्वव्यापी चराचर विश्वाचा माय-बाप म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. क्षत्रीय कुळातील राजा राम असं देखील त्यांना म्हणता येईल. एक गोष्ट खरी आहे की, मुघलांनी भारतीय हिंदु समाजाची मानांकन नष्ट करताना अस्मिता कायम पुसुन टाकण्यासाठी साधारणत: 1500 मध्ये मंदिर उद्धवस्त करून बाबरी मशिद बांधली होती. तदनंतर अखंडित लढा हिंदु बांधवांनी लढला. उद्याचा 22 जानेवारी येवु घातलेला दिवस पुन्हा एकदा देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर दिपावली उत्सव साजरा करण्यासारखाच होय.

आपण सारे असे भाग्यवान आहोत की वर्षातुन दुस­यांदा दिवाळी साजरी करण्याचा योग रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे येताना दिसतो. खरं तर स्वातंत्र्यानंतर रामलल्ला जन्मस्थळाचा प्रश्न मार्गी लावायला हवा होता पण तत्कालीन काळात काँग्रेस व्यवस्थेने हा प्रश्न लोंबकळत ठेवला. केवळ मताच्या लाचारीसाठी ज्याचे साक्षीदार स्वत: शरदचंद्रजी पवार जे की महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मागच्या पन्नास वर्षापासुन काम करताना दिसतात. राम नव्हताच अशा प्रकारची भुमिका अधुनमधुन काँग्रेसवाल्यांनी घेतली त्यात पवारसुद्धा मागे नाहीत. मध्यंतरी नाशकात एका जाहिर कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते की, राम आमच्यासाठी श्रद्धेचा विषय नसुन इतर प्रश्न महत्वाचे वाटतात. स्वत: पवार साहेब नास्तिक म्हणुन ओळखले जातात ज्यांनी कधीच हिंदु देव धर्माला नतमस्तक होवुन लोटांगण घेतल्याचे जाणवत नाही. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारप्रणालीचा अवलंब करताना सनातन धर्म आणि हिंदु धर्माचा द्वेष नेहमीच पवारांनी उघडपणे केल्याचे सत्य लपुन राहिलं नाही.

वर्तमान स्थितीत शरदचंद्रजी पवार हे शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष म्हणुन काम पहातात. वास्तविक पहाता राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पक्षाची मान्यता निवडणुक आयोगाने काढून घेतली तो भाग वेगळा. कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणुन राम मंदिर ट्रस्ट आयोध्या यांनी पवार साहेबांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येण्यासाठी निमंत्रण दिले होते. खरं तर आयोध्येचे पत्र म्हणजे ख­या अर्थाने आपल्या जीवनातील भाग्याचा क्षण समजायलाच हवा. पण अधर्म आणि दुराचार जेव्हा विचारप्रणालीत असतो त्यावेळी स्वत:ला देवापेक्षाही श्रेष्ठ माणुस समजुन घेतो. कदाचित हाच आविर्भाव त्यांच्या एकुण बॉडी लँग्वेजमध्ये असावा. मात्र पवारांनी मंदिर ट्रस्टला उत्तर देताना एक सत्य सहज का होईना? त्यांच्या पेनातील शाईमधुन बाहेर पडले.

ते म्हणाले, राम विश्वव्यापी होता आणि मंदिराचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मी दर्शनासाठी येईल. बरं झालं पवार साहेबांनी प्रभु रामचंद्राचं अस्तित्व वयाच्या 84 वर्षात असताना मान्य केलं हे कमी नव्हे. विश्वव्यापी म्हणजे जगाच्या पाठीवर असलेल्या चराचर जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो हेच कदाचित पवार साहेबांनी मान्य केलं. पण प्रभु रामचंद्राच्या वतीने जेव्हा पत्र येतं त्याला उत्तर देताना हे म्हणतात की, मंदिर बांधकाम झाल्यानंतर मी येईल. अर्थात अध्यात्मिक व्यासपीठावर देखील लिखित राजकारण पुढारी कसे करतात याचे उत्तम उदाहरण होय. म्हणजे रात्रंदिवस एक होवुन आयोध्येत प्रभु रामचंद्राचं मंदिर अल्पकाळात उभा राहिलं. मंदिराचा गाभारा असेल किंवा सभागृह कळसाचे देखील काम पुर्ण झाले असुन केवळ रंगरंगोटी चाललेली आहे. पण ज्या मंदिर बांधकामावर नेहमीप्रमाणे काँग्रेसवाल्यांनी अर्धवट बांधकाम झाल्याचा आक्षेप घेवुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात सुरात सुर पवार मिसळतात म्हणजे या लोकांना रामाचं अस्तित्व मान्य असुन देखील रामाच्या प्रश्नावर राजकारण केल्याशिवाय करमत नाही हे यातुन स्पष्ट होते.

सनातन हिंदु धर्मात धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्म श्रेष्ठ मानल्या जाते, मानवी जीवन जगताना पुण्यकर्माचं संचित पुण्य संकटकाळात कामी येतं असं म्हणतात. मात्र उभ्या आयुष्यात हिंदु धर्माची चेष्टा करून नास्तिक म्हणुन केवळ मताची लाचारी करत राहणाऱ्या पवार साहेबांना आज पक्षांतर्गत किंवा राज्य आणि देशाच्या पातळीवर वयाच्या अंतिम टप्यात त्यांच्या मिरिट राजकारणाची झालेली घसरण कदाचित कर्माची फळे म्हणावी लागतील. कारण या मंडळींनी देवाधिकांना कधी जवळ जावुन नमस्कार घातला नाही. तो केवळ इतर वर्ग समुदायाला दाखवण्यासाठी. बाकी काही असलं तरी 84 वय असताना प्रभु रामचंद्र विश्वव्यापी होता असं म्हणत त्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं हे नसे थोडके.

खरं तर त्यांना मंदिर बांधकामाबाबत असलेला संभ्रम याचं उत्तर काँग्रेसवालेच देवु शकतील. कारण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राज्य आणि देश पातळीवर काँग्रेसवाल्यांनी ज्या प्रकारचे घाणेरडे राजकारण सु डिग्री केले त्यावरून प्रभु रामचंद्राचा वनवास आजही कलियुगात सु डिग्री आहे की काय? असे लक्षात येतं. रावणी प्रवृत्तीचे लोक या उपक्रमावर अधुनमधुन गरळ ओकताना दिसतात. खरं तर पवार साहेबांनी निमंत्रणाचा स्विकार करून उद्याच्या 22 ला आयोध्या गाठली असती तर रामभक्तांनी त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले असतं. पण एकदा वासे फिरले की जळीस्थळी वासे फिरतात. परिणामी सकारात्मक मार्ग शोधता शोधता सापडत नाही. असो. पवारांच्या दृष्टीने ज्यावेळी मंदिर बांधकाम पुर्ण होईल त्यानंतर स्वत: जाणार असतील तर आपण वाट पहात राहु. आभारी यासाठी की तुम्ही प्रभु रामचंद्राचं अस्तित्व मान्य केलं हे नसे थोडके.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर होतंय याचा आनंद; मांस विक्री करणार नाही; कुरेशी समाजाचा निर्णय

Facebook Scam: महिलेला गरोदर करण्याचे 10 लाख रुपये मिळतील… या गर्भधारणेच्या घोटाळ्याला बळी पडू नका!

दोन भावांनी राम मंदिरासाठी बनवला सोन्या-चांदीचा झाडू, लवकरच अयोध्येला पाठवणार