Esha Deol | पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ईशा देओल राजकारणात येण्यास तयार! आई हेमा मालिनी यांनी दिले संकेत

Esha Deol To Join Politics: अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) सध्या तिच्या पतीपासून विभक्त झाल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या जोडप्याच्या विभक्त होण्याने चाहते खूप दुःखी आहेत, मात्र आता यातून बाहेर पडून ईशा राजकारणात (Esha Deol) येण्यासाठी सज्ज झाली आहे. हे आम्ही म्हणत नसून खुद्द अभिनेत्री आई हेमा मालिनी यांनीच तसे संकेत दिले आहेत. ईशाच्या राजकारणातील प्रवेशावर हेमा काय म्हणाल्या जाणून घेऊया?

हेमा मालिनी यांनी खुलासा केला
अलीकडेच हेमा मालिनी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे पती धर्मेंद्र मी जे काही करते त्यात मला नेहमीच साथ देतात. कधी कधी ते मथुरेलाही येतात. माझे कुटुंब नेहमीच माझ्यासोबत असते आणि मी हे सर्व सहजतेने फक्त माझे पती धरमजी यांच्यामुळेच करत आहे.

ते मला खूप सपोर्ट करतात- हेमा
ते मला खूप सपोर्ट करतात आणि मुंबईत माझ्या कुटुंबाची काळजी घेतात. यामुळेच मथुरेत राहून मी माझे काम इतक्या सहजतेने करू शकले. मी येते आणि जाते, मी हे सर्व फक्त माझ्या पतीमुळे करू शकले आणि ते देखील या गोष्टीमुळे खूप आनंदी आहेत.

कुटुंबातील कोणी राजकारणात यावे का?
या मुलाखतीत हेमा यांना विचारण्यात आले की, त्यांच्या कुटुंबातील कोणी राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा आहे का? याला उत्तर देताना ड्रीमगर्ल म्हणाली की, होय, का नाही, तिची इच्छा असेल तर ती नक्कीच येऊ शकते. त्यानंतर ईशाबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, ईशाला या गोष्टीची खूप आवड आहे आणि तिला हे सर्व खूप आवडते. ईशाला तसं वाटलं तर येत्या काही वर्षांत ती नक्कीच राजकारणात येईल.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?