अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्यानं हे षडयंत्र; शरद पवारांचा आरोप 

नवी दिल्ली – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

यादरम्यान महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील असं बंड करण्यात आलं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आमचा एक उमेदवार पराभूत झाल्यासंबंधी आम्ही चर्चा करु असं यावेळी त्यांनी सांगितलं. अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्यानं हे षडयंत्र आखण्यात आलं असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसंच राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.