विराट कोहलीचे ‘हे’ ट्विट बनले 2021 मधील सर्वात जास्त लाइक केलेले ट्विट, पण का?

मुंबई : नकारात्मक बातम्यांमुळे विराट कोहलीचे नाव सध्या चर्चांमध्ये आहे गेले. अलीकडेच त्याला भारतीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर लोक त्याच्याबद्दल ट्विट करत आहेत आणि विचारत आहेत की विराटला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण काय? याचे उत्तर बीसीसीआय आणि विराट कोहली देतील, पण त्याआधी विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

खरं तर, विराट कोहलीच्या एका ट्विटने या वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडले असून सर्वाधिक लाइक केलेल्या ट्विटचा किताब पटकावला आहे. 2021 मध्ये मुलगी वामिकाने विराट कोहलीच्या घरात पाऊल ठेवले. विराटने ट्विटद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली तेव्हा सर्वांना खुप आनंद झाला. विराट कोहलीने केलेले हे ट्विट चाहत्यांना खूप आवडले होते, ज्यामुळे ते 2021 या वर्षातील सर्वात जास्त लाइक केलेले ट्विट बनले आहे. विराट कोहलीच्या या ट्विटला चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळाल्याचेही ट्विटरवरून जाहीर करण्यात आले आहे.

विराट कोहलीने भारतीय अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले आणि आता दोघांना वामिका नावाची मुलगी आहे. विराट कोहली आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी कामातून सुट्टी घेत असतो. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी वामिकासोबतचे त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत मात्र त्यांनी अद्याप मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. चाहत्यांना आशा आहे की 2021 च्या अखेरीस विराट कोहली आपल्या मुलीचा चेहरा दाखवेल आणि चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करेल.