शहर, राज्य आणि देशाच्या स्तरावर आपण केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोचवा; चंद्रकांतदादांचे निर्देश

पुणे : आपल्यासारखा संघटनेचा पाया इतर कोणालाही प्रयत्न करून उभा करता आला नाही. हाच पाया आपली ताकद आहे. शहर, राज्य आणि देशाच्या स्तरावर आपण केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोचवा.पूर्ण निवडणुकीत कोणावरही टीका करू नका. आपण खूप काम केले आहे ते सांगा. तेव्हढे पुरेसे आहे असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी करण्याच्या उद्देशाने भाजप कसबा मतदारसंघाची महाबैठक आरसीएम गुजराती हायस्कूल, फडके हौद चौक येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करीत होते.

पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, धीरज घाटे, शहर संघटन सचिव राजेश पांडे, हेमंत रासने, राजेश येनपुरे, शैलेश टिळक, गणेश बिडकर, कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सचिव राजेंद्र काकडे, कसबा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे, राघवेंद्र मानकर (Pune City President Jagdish Mulik, MLA Madhuri Misal, State Vice President Sanjay Kakade, Dheeraj Ghate, City Organization Secretary Rajesh Pandey, Hemant Rasane, Rajesh Yenpure, Shailesh Tilak, Ganesh Bidkar, Kasba President Pramod Kondhar, Secretary Rajendra Kakade, Kasba Mahila Aghadi President Ashwini Pandey, Raghavendra Mankar) यांची प्रमुख उपस्थिती होती.