शिंदे- फडणवीसांची धमाकेदार कामगिरी; सरकारचं एक महिन्याचं प्रगतीपुस्तक कसं आहे ?

Mumbai – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटला असली तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. असे असले तरी शिंदे आणि फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात त्यांनी जवळपास साडेसातशे शासन निर्णय काढले आहेत. त्यात सार्वजनिक विभागाच्या 91 तर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी 83 निर्णयांचा समावेश आहे.

या शासन निर्णयात आरोग्य विभागाच्या सर्वाधिक 91 तर, पाणीपुरवठा विभागासंबंधी 81 निर्णयांचा समावेश आहे. 12 जुलै रोजी सर्वाधिक, 70 शासन निर्णय प्रसारित झाले असून त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 36 निर्णयांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागासंबंधी 91, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी 83, सामान्य प्रशासन विभागासंबंधी 63 शासननिर्णय घेण्यात आले. तर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागासंबंधी 50, महसुली व वन विभागासंबंधी 44, जलसंपदा विभागासंबंधी 41, कृषी विभागासंबंधी 35 निर्णय घेण्यात आले.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.