ज्यांना संधी दिली ते गद्दार झाले ज्यांचावर अन्याय झाले ते सेनेसोबत राहिले : वरुण सरदेसाई

तुळजापूर – शिवसेनेने ज्यांना नगरसेवक आमदार खासदार केले अशी मंडळी त्यांच्याशी अर्थिक संबध असणारे अन्याय झाला म्हणून गेले पण ज्यांनी पसतीस वर्ष अन्याय सहन केले ते शंभर टक्के शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या सोबत पाठीशी राहिले असे प्रतिपादन युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात आयोजित युवा सेनेच्या मेळाव्यात केले.

सरदेसाई यांनी शनिवारी सकाळी सरचिटणीस यांचे सोलापूर येथुन मराठवाड्यात तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आगमन होताच थेट मंदीरात जावून श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मराठवाडा दौरा आरंभ तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या पहिल्या मेळाव्यत बोलताना देसाई यांनी विरोधकांवर टीका केली.

ते म्हणाले कि महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेने स्वराज्य निर्मीतीसाठी छञपती शिवाजी महाराज याना आशिर्वाद रुपी भवानी तलवार दिली होती. देविजींच्या समोर नतमस्तक होवुन महाराष्ट्रात सेनेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी देविदर्शन घेवुन मराठवाडा दौऱ्यास आरंभ केल्याचे यावेळी स्पष्ट केले. मराठवाड्यातील पैठण येथुन सेना मराठवाडात पसरली तेथील आ भुमरेना पाच टर्म सेनेने संधी देवुन आमदार केले ते गद्दार झाले. माञ गद्दारी करताच तिथे आदित्य गेले ते पैठण आता भगवेमय झाल्याचे स्पष्ट दिसतेय. जिथे आदित्य जातात तिथे सर्वसामान्य त्यांचा स्वागतास येते तो मतदार संघ भगवामय होतो असे अठरा मतदार संघ भगवमेय झाले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता गद्दारांना धडा शिकविण्यासाठी निवडणुकीची वाट बघते आहे. या संकटाला संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहा. या संघर्ष काळात जो सेने सोबत असेल त्यांना निष्ठेचे फळ सेना निश्चित देईल अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हाअध्यक्ष आ. कैलास पाटील,खा ओमराजे निंबाळकर, अक्षय ढोबळे, प्रतिक रोचकरी, रोहीत चव्हाण व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थितीत होते.