देवेंद्र फडणवीस हे हिंदूह्रद्यसम्राट, नितेश राणे यांचा दावा

शिर्डी – भाजप नेते आमदार नितेश राणे हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी शिर्डीत केलेले एक वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे उपमुख्यमंत्री आहेत. हे शिर्डीतील पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane)यांनी दिला आहे.

अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यात हजारो जण सहभागी झाले होते. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रद्यसम्राट असा केला आहे.

यावर देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्यात चुकीचं काय? जो जो हिंदूचे रक्षण करतो, हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं असा प्रतिप्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) हिंदुहृदयसम्राट आहेतच आणि कायम राहणार, असेही राणे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्रात आता हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट आहेत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.