महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा अखेर रद्द

मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्नाटक सरकारची परवानगी न मिळाल्याने हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची या समन्वयक मंत्री म्हणून निवड करत आली होती. आज मंगळवार, 6 डिसेंबर रोजी त्यांचा होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी काही गोंधळ, वादविवाद नको म्हणून दौरा टाळण्यात आल्याचे सांगून हा दौरा रद्द करण्यात आला.