“आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन…”, अक्षय कुमारने सुरू केली ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची शूटिंग

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आज त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटींगची सुरुवात केली आहे. त्याने स्वत: ट्वीटरद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने हिंदीमध्ये ट्वीट करत लिहिले आहे की, ‘आजपासून मराठी सिनेमा वेडात मराठे वीर दौडले सातची शूटिंग सुरू करत आहे. ज्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणार आहे. शिवाजी महाराजांची भूमिका मिळणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मी त्यांच्या जिवनापासून प्रेरणा घेत आणि आई जिजाऊंचा आशीर्वाद घेत ही भूमिका योग्यरित्या पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करेल.’ या ट्वीटमध्ये अक्षय कुमारने शिवाजी महाराजांना वंदन करतानाचा फोटो जोडला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मराठी सिनेमा वेडात मराठे वीर दौडले सातमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असेल. या सिनेमाचे निर्माते वसीम खुरेशी हे आहेत. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होईल.