TMC प्रवक्ता साकेत गोखले यांना अटक; गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावर पकडले

जयपूर-  गुजरात पोलिसांनी टीएमसीचे प्रवक्ते साकेत गोखले (Saket Gokhale) यांना अटक केल्याचा दावा टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. डेरेक ओब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरबी पूल दुर्घटनेबाबत गोखले यांनी केलेल्या ट्विटवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डेरेक ओब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी गोखले यांना जयपूर येथून अटक केली.

TMC खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, साकेत गोखले यांनी सोमवारी रात्री 9 वाजता दिल्लीहून जयपूरला जाणारे विमान घेतले होते. जयपूरला पोहोचताच गुजरात पोलीस विमानतळावर त्यांची वाट पाहत होते. त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली.

डेरेक ओब्रायनच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी पहाटे 2 वाजता साकेत गोखलेने त्याच्या आईला फोन केला आणि सांगितले की पोलीस तिला अहमदाबादला घेऊन जात आहेत. टीएमसी खासदाराने दावा केला की पोलिसांनी त्याला फक्त दोन मिनिटे कॉल करण्याची परवानगी दिली, त्यानंतर त्याचा फोन आणि सामान जप्त करण्यात आले.