ऐश्वर्या रायबद्दल अश्लील विधान करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरला घडली अद्दल, माफी मागत म्हणाला…

Abdul Razzaq apologizes for Aishwarya Rai statement : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत करत असताना जीभ घसरली. अब्दुल रज्जाकच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूबद्दल बोलताना अब्दुल रज्जाक म्हणाला की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ऐश्वर्या रायशी लग्न कराल आणि त्यानंतर एक सद्गुणी मूल जन्माला येईल असे वाटत असेल तर असे कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे हेतू सुधारावे लागतील.

मात्र या वक्तव्यानंतर टीकेचा सामना करावा लागल्याने रज्जाकने माफी मागितली आहे. अब्दुल रज्जाक पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीवर म्हणाला, “आम्ही क्रिकेट कोचिंग आणि हेतूंबद्दल बोलत होतो. माझी जीभ घसरली आणि मी चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी वैयक्तिकरित्या तिची माफी मागतो, माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता.”

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…