तुनिषा शर्मा होती गरोदर? बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने उचलले टोकाचे पाऊल?

Tunisha Sharma Suicide: ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ सीरियलची अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने शनिवारी सेटवर आत्महत्या केली आहे. तुनिषाचे वय केवळ २० वर्षे होते. ती टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. ती गेल्या काही दिवसांपासून सेटवर खूप तणावात दिसत होती. म्हणून डिप्रेशनमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. अशातच या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी तुनिषा गरोदर (Tunisha Sharma Pregnent) होती, अशी माहिती पुढे येत आहे.

फिल्मी बिटच्या वृत्तानुसार, “अलीबाबा दास्तान-ए-काबुलच्या सेटवरून अशी माहिती मिळाली आहे की, अभिनेत्री तुनिषा ही गरोदर होती. ती आणि तिचा को-स्टार शीजान मोहम्मद खान रिलेशनशीपमध्ये (Sheezan Khan) होते. परंतु तुनिषा गरोदर झाल्यानंतर शीजानने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने ती तणावात होती. कदाचित याचमुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा.” असे असले तरीही, अद्याप याबद्दल अधिकृत पुष्टी झालेली नाही.

‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या सीरियमधून तुनिषाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूचवाला, शेर-ए-पंजाब- महाराजा रणजीत सिंह, इंटरनेट वाला लव, इश्क सुभान अल्लाह आणि काबुलमधील अलीबाबा दास्तान-ए-काबूल या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. ती शेवटची अलीबाबा दास्तान-ए-काबुलमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने राजकुमारी मरियमची भूमिका साकारली होती.

तसेच तुनिषा शर्माने फितूर, बार बार देखो, कहानी 2, दुर्गा रानी सिंह आणि दबंग 3 मध्ये देखील काम केले आहे. तिने फितूर आणि बार बार देखो मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, ती कहानी 2 आणि दुर्गा राणी सिंहमध्ये विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिने सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग 3 मध्येही कॅमिओ केला होता.