पेट्रोल डीझेल दर कपात : जे अडीच वर्षात घडत नव्हते ते आता घडतेय, हे तर जनसामान्यांचे सरकार – वाघ

मुंबई : आज कॅबिनेटच्या बैठकीत (Today’s Cabinet Meeting) काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या (Petrol- Diesel Price) किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान, आज घेतलेल्या या निर्णयाचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कौतुक केले आहे. सर्वसामान्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा (Shinde- Fadanvis Government) पुन्हा दिलासा. पेट्रोल वर ५ तर डिझेल वर तीन रुपयांची कर कपात… जे अडीच वर्षात घडत नव्हते ते आता घडतेय. हे तर जनसामान्यांचे सरकार… असं म्हणत वाघ यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.