राजेशाही असती तर याकूब मेमनच्या कबरीचा बंदोबस्त केला असता – उदयनराजे भोसले

मुंबई – दहशतवादी याकूब मेमनच्या (Terrorist Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. भाजप आणि शिंदे गट (BJP and Shinde group) महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडला आहे तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देत आहे.

दरम्यान, याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनीही या वादात उडी घेतली आहे. राजेशाही असती तर असे प्रकार घडले नसते असे त्यांनी सांगतिले आहे. तुम्ही लोकांनी मागणी केली राजेशाही नको लोकशाही हवी. त्यामुळे आज याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत, राजेशाही आसती तर कधीच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला आसता. अशी तीव्र प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.