थायलँडच्या संरक्षण मंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी घेतली भेट

थायलँडमध्ये भारतीय बुध्दविहार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

Ramdas Aathvale Thailand- थायलँड हे बौध्द राष्ट्र आहे. थायलँडमध्ये अनेक बुध्दविहारे आहेत. मात्र थायलँडमध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुध्दविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात यावे. त्यासाठी थायलँड सरकारने जमीन द्यावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.

आज बँकॉक येथील थायलँडचे संरक्षणमंत्री नाम. डॉ.सुतीन कुंगसंग यांची भेट घेवून ना.रामदास आठवले यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी थायलँडमध्ये भारतीय बौध्द संस्कृतीचे बुध्दविहार आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची मागणी केली.यावेळी थायलँड प्रधानमंत्री कार्यालयाच्या प्रमुख पी आर ओ डॉ जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या.

थायलँड मध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीचे बुद्ध विहार आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय केंद्र साठी जमीन थायलँड सरकार तर्फे देण्यात येईल असे आश्वासन थायलँड चे संरक्षण मंत्री डॉ.मा.सुतीन कुगसंग यांनी ना.रामदास आठवले याना दिले.

थायलँड मध्ये राहणाऱ्या भारतीयांनी बँकॉक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी बँकॉक मधील हॉटेल रेडिसन येथे स्नेहभोजन समारंभ आयोजित केला होता.त्या कार्यक्रमास थायलँड चे संरक्षणमंत्री डॉ.मा. सुतीन कुंगसंग आणि थायलँड च्या प्रधानमंत्र्यांच्या पी आर ओ डॉ जीब चंत्रास्मी उपस्थित होत्या.

यावेळी ना.रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी सौ. सीमाताई आठवले; पुत्र जित आठवले; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे;रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे; बँकॉक मध्ये स्थायिक झालेले भारतीय उद्योजक राज वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

थायलँडमध्ये महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा ; ग्रंथालय, विपश्यना केंद्र; सभागृह; आदी बाबींचा समावेश असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र थायलँड मध्ये उभारण्यात यावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माचा प्रसार सम्राट अशोक यांनी केला. जगभर बौध्द धम्माचा प्रसार त्यांनी केला. सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन भारतात महामानव बोधिसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यांनी मानवतेच्या समतेच्या विचारांसाठी उभारलेला मानवमुक्तीचा लढा ; त्यांनी भारतात केलेले धम्मचक्र प्रवर्तन याची जगात नोंद झाली आहे.त्यामुळे थायलँडमध्ये महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले पाहिजे अशी सुचना ना. रामदास आठवले यांनी यावेळी थायलँडचे संरक्षणमंत्री नामदार डॉ.सुतीन कुंगसंग यांना केली.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी