शबाना बनली शिवाणी; म्हणाली, ‘मुस्लिम महिला मुलं जन्माला घालण्याची मशीन, माझ्या आईचा सुद्धा असाच मृत्यू’;

Shabana Becomes Shivani: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या हिंदी सिनेमानंतर धर्मांतराचा मुद्दा भरपूर चर्चेत आला. बऱ्याचशा मुस्लीम महिलांनी हिंदू धर्म स्विकारल्याच्या बातम्याही वाचायला मिळाल्या. आता उत्तर प्रदेशच्या फरीदपूरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शबानाने (Muslim Girl Shabana) मंगळवारी आपल्या हिंदू प्रियकर अरविंदसोबत लग्न केलं आहे. शबाना आता शिवानी झाली आहे. शिवानीला हिंदू धर्माच आचरण करायला आवडतं. ती भगवान शिवानी मोठी भक्तही आहे. शिवानीने बुर्खा, हिजाब, तीन तलाक, हलाला आणि बहु विवाह या कुप्रथा असल्याच सांगितलं.

मढ़ीनाथ येथील अगस्त मुनि आश्रमात आचार्य पंडितच्या शंखधारने गोमूत्र आणि गंगाजलने शबानाचा शुद्धिकरण केलं. त्यानंतर मंत्रोच्चारात शिवानीने अरविंद सोबत लग्न केलं.  शबाना भगवान शंकराची पूजा करते. शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करते. इतकच नाही, ती ओम नमः शिवाय जपही करते. शिवशंकरावर तिची प्रचंड श्रद्धा आहे.

इस्लाममध्ये महिलांना मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं जातं. तिच्या आईचा सुद्धा मुलं जन्माला घालताना मृत्यू झाला. शबानाला 8 भाऊ आहेत. ती त्यांच्या घरातील एकटी मुलगी. आई-वडिल दोघांचा मृत्यू झालाय. मुस्लिम समाजात महिलांना हिजाब आणि बुर्खा घालावा लागतो. हिंदू धर्मात मोकळ्या हवेत श्वास घेता येतो. हिंदू धर्मात महिलांना सन्मान मिळतो असं शिवानी म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस