आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी

केंद्र व राज्य शासनाकडून सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी याचे २००० रु. पडत असलेल्या बँक खात्यांना बँकेकडून होल्ड मारण्यात येत आहेत. यासोबत शासनाकडून दुष्काळी अनुदान व इतर शासकीय मदत अडचणीच्या काळामध्ये सरकारकडून मदत म्हणून शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होत असलेले पैसे शेतकऱ्यांना देण्याऐवजी बँका त्या बँक खात्यांना होल्ड मारून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत.

शासकीय मदत व अनुदान जमा होत असलेल्या बँक खात्याला होल्ड मारणाऱ्या बँकाना होल्ड काढण्याचे आदेश द्या,आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा अशी मागणी तहसील कार्यालयाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दि.23 नोव्हेंबर रोजी केली आहे.

सरकारकडून देत असलेल्या अनुदान व मदतीच्या पैशाचे बँकांनी अडवणूक करू नये, अन्यथा अडवणूक करत असलेल्या बँकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तरी बँका या आदेशाची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांची २००० रु. व इतर शासकीय अनुदान व मदतीत शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. हि अडवणूक तात्काळ थांबली पाहिजे व हि मदत जमा असलेल्या बँक खात्यांचे तात्काळ होल्ड काढले पाहिजे. या बँकांना तात्काळ होल्ड काढण्याचे आदेश द्यावेत, आदेश देऊनही ज्या बँका बँक खात्यांचे होल्ड काढणार नाहीत त्या बँकावर कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी प्रहारचे हणमंत मुगवणे,स्वाभिमानीचे हरिदास पाटील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-