‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

Aishwarya Rai: अभिनेत्री त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मन्सूर अली खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेता-राजकारणी राधा रवी (Radha Ravi) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने म्हटले होते की, जर मला हिंदी येत असते तर ऐश्वर्या रायवर बलात्कार करण्याची संधी मिळाली असती, असे राधा रवी व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. गायिका चिन्मयीने राधा रवींची ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. रवी राधा यांनीही बलात्काराची खिल्ली उडवली होती, यावर लोक हसत आहेत, मात्र कुणाला कारवाईची गरज का वाटली नाही? असा सवाल चिन्नमयीने उपस्थित केला आहे.

मला हिंदी येत असते तर…
या व्हिडिओमध्ये राधा रवी तामिळ बोलत आहेत. चिन्मयीने याचे इंग्रजीत भाषांतर करून लिहिले आहे की, ‘मी एकदा म्हणालो होतो की जर मला हिंदी येत असते तर मला ऐश्वर्या रायवर बलात्कार करण्याची संधी मिळाली असती. मी बॉलीवूडमध्ये काम करेन असे मला म्हणायचे होते. मला या तमिळ पाप्यांसोबत का काम करावे लागेल?

चिन्मयीने लिहिले आहे की, हा व्हिडिओ तमिळ भाषेत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की लोक एवढ्या मोठ्या जोकवर हसत आहेत. मन्सूर अली खान यांनी जे सांगितले तेच राधा रवी यांनीही सांगितले आहे. त्यांनी इंडिया टुडेमध्ये ऐश्वर्या रायवर बलात्काराचा विनोद केला होता. मला हे जाणून घ्यायचे आहे की या माणसावर कारवाई करण्याची गरज कोणाला का वाटली नाही? राधा रवी यांच्या वक्तव्याला अनेकांनी चुकीचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis