Brajesh Pathak | उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक पुणे दौऱ्यावर

Brajesh Pathak – आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) तयारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) आज (28 फेब्रुवारी) पुणे क्लस्टरमधील पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pandey) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

पांडे म्हणाले, या दौऱ्यादरम्यान तीनही लोकसभा मतदार संघातील बूथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखांचे मेळावे होणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकांमध्ये पाठक मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, उपाध्यक्ष माधव भांडारी, शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील सर्व आमदार आणि प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सकाळी 11.00 वाजता शिरूर मतदारसंघाची, कात्रज बायपास येथील हांडे लॉन्स येथे दुपारी 12.30 वाजता बारामती मतदारसंघाची आणि कर्वे नगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे दुपारी 4.30 वाजता पुणे लोकसभेची बैठक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी