सासुबाईचा साखरपुडा चित्रपटाचे गाणे प्रदर्शित

Sasubaicha Sakharpuda: समाजातल्या अनेक समस्यांपैकी उतारवयातला ऐकटेपणा ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. या समस्येचा अनोखा मार्ग म्हणजे एकमेकांची साथ. अशाच एकटेपणाच्या समस्येवर सासुबाईचा साखरपुडा हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे गाणे नुकतेच रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॅा. बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रिक्षावाला हा समाजातली सर्वात दुय्यम घटक मानला जातो. पण त्यांच्यातच खरी माणुसकी जपलेली असते.

रॅाकस्टार स्टुडिओ प्रस्तुत आणि दिल राज फिल्म्स प्रॅाडक्शनचे दिलीप आबनावे चित्रपटाचे निर्माते असून बाळासाहेब गोरे यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. दिलीप आबनावे यांच्यासमवेत संगीता पिंगळे, आशुतोष गोरे, श्रद्धा, सुनील नाईक, पूनम पवार , आणि पाहुणे कलाकार डॅा. राजेंद्र भवाळकर, हेमंत पाटील यांच्या भूमिका आहेत.

याविषयी बोलताना निर्माते दिलीप आबनावे यांनी सांगितले की, उतारवयातली एकटेपणाची जाणीव ही कायम क्लेशदायक असते. अशा वेळेला मिळणारी साथ ही मोलाची असते. या विषयाला अनुसरुन विनोदी कौटुंबिक चित्रपट सगळ्यांचे मनोरंजन करेल आणि सामाजिक संदेश देईल.
तर लेखक बाळासाहेब गोरे यांनी सांगितले की पुरोगामी विचारांची प्रेरणा घेऊन नवीन विचार समोर मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून केला आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत लागणारी साथ ही कायम संजीवनी असते. हाच संदेश चित्रपटातून मांडण्यात आला आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट पहावा असे आवाहन दिल राज प्रॅाडक्शनचे सर्वेसर्वा दिलीप आबनावे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’