Uttarkashi Tunnel Rescue Successful :कामगार बोगद्यातून बाहेर पडताच भारत माता की जय च्या सिल्क्यारा घोषणांनी बोगदा दुमदुमला 

Uttarkashi Tunnel Rescue Successful: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेले 41 मजूर मंगळवारी (28 नोव्हेंबर) बाहेर आले आहेत. सिल्कारा बोगद्यातून कामगार बाहेर येताच उपस्थित लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी संपूर्ण बोगदा आणि बाहेरचा परिसर ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यादरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी बाहेर काढलेल्या कामगारांची भेट घेतली. बचाव मोहिमेच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्यात गुंतलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांच्या आरोग्य तपासणी बोगद्यात बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामगार बाहेर पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “सिल्क्यरा बोगद्याच्या दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी आनंदी आहे,” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले.हे काम अनेक एजन्सींनी एकत्रितपणे केलेले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि प्रार्थनांमुळे हे शक्य झाले. या बचाव कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक एजन्सी आणि व्यक्तीचे मी आभार मानतो.