‘गोडसेला ह्रदयात ठेवणाऱ्या आणि गांधींना फक्त ओठावर ठेवणाऱ्या नेत्यांची लाज वाटते’

मुंबई –  काँग्रेस (Congress)आमदार  जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. जिग्नेशला गुजरातमधील पालनपूर सर्किट हाऊसमधून (Palanpur Circuit House) अटक करण्यात आली आहे. आसाममधील एका प्रकरणात जिग्नेश मेवाणीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रथम जिग्नेश मेवाणीला अहमदाबादला नेले आहे (Jignesh Mewani has been taken to Ahemadabad). तेथून आसामला नेण्यात आले आहे. जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा (Wadgam Assembly) मतदारसंघातून आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,त्यांना गेल्या बुधवारी रात्री पालनपूर सर्किट हाऊस येथून अटक करण्यात आली. मेवाणीला अहमदाबादला नेण्यात आले आहे, पुढे त्याला  गुवाहाटीला नेण्यात आल्याचे वृत्त आहे. जिग्नेश मेवाणीच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, आसाम पोलिसांच्या पथकाने त्याला आसाममध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केली आहे.

दरम्यान, जिग्नेश मेवाणी यांना दोनदा अटक केल्याने बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “महात्मा गांधींची हत्या करणारा गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. गोडसेला ह्रदयात ठेवणाऱ्या आणि गांधींना फक्त ओठावर ठेवणाऱ्या नेत्यांची लाज वाटते. जिग्नेश मेवाणी हिम्मत ठेवा, सत्याचा विजय होईल. असं त्यांनी म्हटले आहे.