Vijay Shivatare | ‘तो’ बदला घेण्याची वेळ आता आली आहे, शिवतारे अजित पवारांवर बरसले

Vijay Shivatare | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये थेट सामना होईल अशी शक्यता असताना दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

यातच सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) दंड थोपटले आहेत.

पवार कुटुंबाला आव्हान देत शिवतारे म्हणाले, पुरंदरच्या स्वाभिमानी जनतसेठी मी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेतला आहे. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई… हेच सगळीकडे चाललंय ना… अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा काही कोणाचा सातबारा नाही. ५० वर्षे बारामतीचा खासदार पाहिजे, अशी काहींची भूमिका आहे. परंतु, पुरंदर, इंदापूर भोरचा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा यांना निवडून द्यायचं… काय मिळालं आम्हाला…? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य