जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूने हंगेरीमध्ये तिरंगा फडकावला

Sangeeta Phogat : दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणारी महिला कुस्तीपटू संगीता फोगटने बुडापेस्टमधील रँकिंग मालिका कुस्ती स्पर्धेत तिसऱ्या-चौथ्या स्थानाच्या सामन्यात हंगेरीच्या व्हिक्टोरिया बोर्सोसचा पराभव केला. या विजयासह संगीताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 59 किलो गटात विजय मिळवला.

संगीताने तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाच्या लढतीत हंगेरियन कुस्तीपटूचा 6-2 असा पराभव केला. संगीता टेकडाउन मूव्हसह लीड घेतला होता पण यानंतर हंगेरियन कुस्तीपटूने स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर संगीताने आक्रमक खेळ करत विजय मिळवला.
संगीता ही ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाची पत्नी आहे. ती नुकतीच जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी झाली होती. यानंतर तिची बहीण बबिता फोगटने कांस्य पदक जिंकल्याबद्दल संगीताचे अभिनंदन केले आहे.