Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Pankaja Munde | सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत नेते धनंजय मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपकडून उमेदवारीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं असताना आज पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

बीडमध्ये एका सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटलं की पाचचं वर्षांचा असावा या युगात बाबा ! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा, आम्हाला 5 वर्षंच खूप झाला. का अजून पाहिजे तु्म्हाला ? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत? असा सवाल पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केला.

पुढे त्या म्हणाल्या, मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे (कार्यकर्त्यांमुळे).. तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही. खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य