Uddhav Thackeray | महायुतीला जे जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं; ‘या’ बाबतीत घेतली आघाडी 

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यामध्ये थेट सामना होईल अशी शक्यता असताना दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्या तरी महाराष्ट्रात महायुती किंवा महाविकासआघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपने देशभरातली पहिली यादी जाहीर केली असली तरी यात महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महायुती आणि महाविकासआघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी उद्धव ठाकरेंनी आघाडी घेतली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने आतापर्यंत 5 उमेदवारांची नावं जाहीर कार्यक्रमातूनच सांगितली आहेत. रायगडमधून अनंत गिते, मावळमधून संजोग वाघेरे, मुंबई उत्तर-पश्चिममधून अमोल किर्तीकर रिंगणात उतरतील, याची घोषणाच उद्धव ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमातून केली. तर ठाण्यातून राजन विचारे उमेदवार असतील असं आदित्य ठाकरेंनी ठाण्यातल्या कार्यक्रमात जाहीर करून टाकलं.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून दिल्लीला पाठवण्याचं वक्तव्य केलं. यामुळे महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार जाहीर करण्यात सध्या तरी ठाकरेंनी आघाडी घेतली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य