अजगराने चक्क आख्खा कोब्रा गिळला, चित्तथरारक प्रसंग कॅमेरात कैद; Video व्हायरल

नवी दिल्ली- सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यात जंगलात अजगरांनी अनेक मोठ्या शिकार केलेल्या तुम्ही पाहिले असेल. पण तुम्ही कधी अजगराला त्याच्याच प्रजातीचा प्राणी गिळताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ कर्नाटकातील म्हैसूरमधून समोर आला आहे, ज्यामध्ये अजगराचे भयानक रूप पाहायला मिळाले आहे. 21 सेकंदाच्या या क्लिपमध्ये, क्रूर अजगर कोब्रालाही सोडत नाही आणि संपूर्ण गिळतो. (Black Python Swallows Cobra)

वास्तविक सध्या देशात पावसाळा सुरू आहे. या मोसमात कोब्रा आणि अजगर बाहेर पडणे सामान्य आहे. सहसा पावसाळ्यात बिळात राहणारे सरपटणारे प्राणी पावसामुळे रस्त्यावर येतात आणि लोकांना चावतात. मात्र अजगराने आपल्याच प्रजातीचे प्राणी गिळल्याची घटना प्रथमच पाहायला मिळाली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अशी अलौकिक घटना सहसा जंगलात पाहायला मिळते. मात्र रविवारी ते कर्नाटकातील म्हैसूर शहराच्या मध्यभागी दिसून आले. हे पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना धक्का बसला आणि त्यांनी कॅमेरा काढून त्याचा व्हिडिओ बनवला. 21 सेकंदाची ही क्लिप सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. लोकांकडून ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.