Supriya Sule | सुप्रिया सुळेंना मोठा धक्का ; प्रचार अर्ध्यावर सोडून ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात दाखल

पुणे | बारामती लोकसभा (Baramati LokSabha 2024) मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज उमेदवारी अर्ज सादर करीत आहेत. आज पुण्यात आघाडीमार्फत मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मात्र त्याआधीच सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. वेल्हे सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रताप शिळीमकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रताप शिळीमकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. त्याआधी पुरंदरमधील सुप्रिया सुळे यांचे प्रचारप्रमुख प्रवीण माने यांनी देखील सुप्रिया सुळेंची साथ सोडल्याने ऐननिवडणुकीत कार्यकर्ते सोडून गेल्याने याचा मोठा परिणाम निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

यातच वेल्हे तालुक्याचा विकास होण्यासाठी विकासाभिमुख नेतृत्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असल्याची शिळीमकर यांनी माहिती दिलीय. तर प्रताप शिळीमकर यांचा प्रथम कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यात चांगला जनसंपर्क राहिला आहे. त्यांची पत्नी वेल्हे पंचायत समितीच्या माजी सदस्य राहिल्या आहेत. तर राजगड कारखान्यावर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय व विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या अजितदादा गटातील प्रवेशामुले वेल्हे तालुक्यातील या गटाची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, माझी कोणालाही दुखवण्याची भावना नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत मी माझ्या कार्यकर्त्यांसह सहभागी होतो. मात्र शरदचंद्र पवार गटात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आले. उमेदवार सुप्रिया सुळे आणि पदाधिकाऱ्यांना माझी गरज आहे की नाही. अशी मला शंका आली. दिवसभर दौऱ्यात असून खासदार सुळे साधा संवाद साधत नाही की ओळख देत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त करून दाखवलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात