जनतेच्या पैशांची उधळपट्टी; मंत्र्यांची सरकारी नव्हे तर खासगी रुग्णालयाला उपचारासाठी पसंती 

नाशिक :  मागील दोन वर्षांत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्यासह 18 मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयाऐवजी (Government Hospital)  खासगी रुग्णालयात (Private hospital) उपचार घेतले आहेत. एवढंच नाही तर 1 कोटी 40 लाख रुपयांचे बिल खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्याचं माहितीच्या अधिकारात (Right to Information) निष्पन्न झालं आहे. पण कुठल्या आजारासाठी मंत्र्यांवर उपचार झाले याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. नाशिकच्या पत्रकार दिप्ती राऊत (Journalist Dipti Raut) यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त झाली आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांना विशेषत: सर्वसामान्यांना बेड मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले होते. परंतु याच काळात मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीमधून बिलं भरली. यामध्ये सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहेत. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी काँग्रेसच्या (Congress) सहा आणि शिवसेनेच्या (Shivsena) तीन मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

कोणत्या मंत्र्याचे किती झाले बिल ?

1. आरोग्य मंत्री राजेश टोपे – 34 लाख 40 हजार 930
2. ऊर्जा मंत्री नितीन राऊत – 17 लाख 63 हजार 879
3. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ – 14 लाख 56 हजार 604
4. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार – 12 लाख 56 हजार 748
5. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड – 11 लाख 76 हजार 278
6. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – 9 लाख 3 हजार 401
7. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार – 8 लाख 71,890
8. जलसंपदा मंत्री जयंत पाटील – 7 लाख 30 हजार 513
9. उद्योग मंत्री सुभाष देसाई – 6 लाख 97 हजार 293
10. परिवहन मंत्री अनिल परब – 6 लाख 79 हजार 606