मधुमेही व्यक्तींना हाय-फायबर पूरके घेण्याचे प्रत्यक्षात काय लाभ होऊ शकतात? सर्वेक्षणात पुढे आली ही माहिती

Health: ‘स्टार’ (Survey for ManagemenT of DiAbetes with FibeR-rich Nutrition Drink) अर्थात फायबरने समृद्ध पोषक पेयाच्या माध्यमातून मधुमेह व्यवस्थापनाचे सर्वेक्षण) ह्या भारतभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अलीकडेच ‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल प्रॅक्टिस’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ह्या सर्वेक्षणात, टाइप-२ प्रकारचा मधुमेह असलेल्या ३,०४२ व्यक्ती आणि १५२ डॉक्टर ह्यांचा सहभाग होता.

मधुमेही व्यक्तींनी दररोज फायबर-समृद्ध आहार पूरके घेतल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यामध्ये मदत होऊ शकते असा निष्कर्ष ह्या सर्वेक्षणामध्ये काढण्यात आला आहे. ह्या सर्वेक्षणात मधुमेही व्यक्तींना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. ह्यापैकी एका गटातील व्यक्तींनी एक विशिष्ट फायबर-समृद्ध पूरक किमान तीन महिने घेतले, तर दुसऱ्या गटातील व्यक्तींनी हे पूरक घेतले नाही. फायबरयुक्त पूरक तीन महिने घेतलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात नियंत्रणात असल्याचे एचबीएवनसी चाचणीत दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांच्यात, वजन कमी होण्याचे प्रमाण आणि तृप्ततेची भावना, पूरक न घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक होती.

फायबरचे प्रमाण अधिक असलेला आहार मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतो हे आजवर जगभरातील अनेक क्लिनिकल अभ्यासांद्वारे प्रस्थापित झाले आहे. आरएसएसडीआय आणि अमेरिकन डायबेटिस असोसिएशन ह्यांसारख्या संस्थाही मधुमेही व्यक्तींना फायबरयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घेण्याची शिफारस करतात. भारतातील मधुमेही व्यक्तींनी दररोज २५-४० ग्रॅम फायबर आहारातून घेतले पाहिजे अशी शिफारस आरएसएसडीआयने केली आहे. मात्र, भारतातील विविध सामाजिक-आर्थिक गटांमधील व्यक्तींच्या दररोजच्या आहारातील फायबरचे प्रमाण १५-४० ग्रॅम एवढेच आहे. ह्याचा अर्थ भारतात प्रत्येक मधुमेही व्यक्तीला दररोज जेवढे फायबर आवश्यक आहे, तेवढे ते मिळत नाही आहे.

फायबरने समृद्ध अशा आहार पूरकांच्या माध्यमातून ही तफावत कशी भरून काढली जाऊ शकते आणि मधुमेही व्यक्तींना रक्तातील साखरेची पातळी प्रभावीरित्या नियंत्रित ठेवण्यात कशी मदत केली जाऊ शकते हे ‘स्टार’ सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

साउथ आशियन फेडरेशन ऑफ एण्डोक्राइन सोसायटीजचे (एसएएफईएस) अध्यक्ष आणि ह्या सर्वेक्षणाचे प्रमुख लेखक डॉ. संजय कालरा सांगतात, “योग्य आहार हे मधुमेह व्यवस्थापनाचे अविभाज्य अंग आहे. मधुमेही व्यक्तींनी आहारातील साखरेचे व कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट्स) प्रमाण कमी करण्याची आवश्यकता तर आहेच, शिवाय, त्यांनी आहारातील फायबरचे प्रमाण वाढवण्याचीही आवश्यकता आहे. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि अतिरिक्त आहार घेणे टाळले जाते. पचनाच्या क्रियेत, आतड्यांतून रक्तामध्ये साखर शोषून घेतली जाण्याचे प्रमाण फायबरमुळे कमी होते आणि जेवणानंतर वाढणारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते. बहुतेकदा मधुमेही व्यक्तींना त्यांच्या आहारातून आवश्यक तेवढे फायबर मिळत नाही. फायबरने समृद्ध असलेली पोषक पूरके घेतल्यास त्यांना दररोज आवश्यक असलेले फायबर मिळू शकते हेच ह्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.”

मधुमेहाचे व्यवस्थापन म्हणजे केवळ वैद्यकीय उपचारांना चिकटून राहणे नव्हे असाही निष्कर्ष ह्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. रुग्णांना वजनाचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करण्याची गरज भासते.
‘स्टार’मध्ये १५२ फिजिशिअन्सचाही सहभाग होता. डॉक्टर टाइप-२ मधुमेहाच्या ५० टक्के रुग्णांना, स्थूलतेसाठी उपचार घेणाऱ्या ४० टक्के रुग्णांना आणि अतिरिक्त शारीरिक वजन असलेल्या ३५ टक्के रुग्णांना फायबर-समृद्ध पूरके घेण्याचा सल्ला देतात, असे सर्वेक्षणात आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या मते, मधुमेही व्यक्तींनी फायबर समृद्ध आहार घेण्याचा प्रमुख लाभ म्हणजे त्यांच्यातील तृप्ततेच्या भावनेत होणारी सुधारणा होय. त्याचबरोबर त्यांची शारीरिक हालचाल वाढते, एचबीएवनसी व ग्लुकोजची पातळी कमी होते आणि रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांची संख्या व डोस कमी केला जाऊ शकतो. टाइप २ मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये आहारातील फायबरची भूमिका समजून घेण्यासाठी रुग्ण व डॉक्टर्स दोहोंमधील जागरूकता वाढवण्याची गरज आहे असेही फिजिशिअन्सने अधोरेखित केले.

For media enquiries:

Taera Shapoorjee
Email: [email protected]

Desiree Crasto
Email: [email protected]

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला