लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो कोण आहे? मेस्सी सोबतची तिची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे

Antonela Roccuzzo:  अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच, पण इथे आम्ही तुम्हाला त्याची पत्नी अँटोनेला रोकुझोबद्दल सांगणार आहोत. लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. त्याने मैदानात आपल्या खेळाची जादू अनेकवेळा दाखवून ट्रॉफी जिंकली आहे. यावेळी देखील लिओनेल मेस्सीच्या संघ अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022 ची अंतिम ट्रॉफी जिंकली. या विजयामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत. तथापि, सर्वात आनंदी त्याची पत्नी अँटोनेला रोकुझो आहे.

अँटोनेला रोकुझो हिने सोशल मीडियावर मेस्सीच्या विजयावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून मला मेस्सीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. मेस्सीच्या या विजयामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत आहे, ज्यासाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असेही अँटोनेलाने लिहिले आहे. मेस्सीच्या पत्नीची ही पोस्ट लोकांच्या मनाला भिडणारी आहे.

अँटोनेला ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी लहानपणापासून मेस्सीची ढाल बनून त्याला साथ देत आहे. दोघेही बालपणीचे मित्र.मेस्सी आणि अँटोनेला हे रोझारियोचे रहिवासी आहेत. दोघेही वयाच्या पाचव्या वर्षापासून एकमेकांचे मित्र आहेत. अँटोनेला ही मेस्सीच्या मित्राची चुलत बहीण होती. त्यांची मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांच्या जवळ आले. मेस्सी आणि अँटोनेला यांनी कधीही सुख-दु:खात एकमेकांचा हात सोडला नाही.

जेव्हा मेस्सी त्याच्या पॅशन फुटबॉलला फॉलो करण्यासाठी बार्सिलोनामध्ये शिफ्ट झाला, तेव्हा त्याला अँटोनेलाची मैत्रिण मरण पावली आहे आणि ती तुटली आहे अशी बातमी त्याला समजताच, त्याने काहीही विचार न करता ताबडतोब त्याच्या शहरात परतला आणि अँटोनेलाला भेटला.  तिच्या सोबत उभे राहून  तिला प्रोत्साहित केले.

अँटोनेला दंतचिकित्सकाचा (Dentist) अभ्यास करत होती, पण मेस्सीला पाठिंबा देण्यासाठी तिने अभ्यास सोडला आणि खेळाडूसोबत राहण्यासाठी ती बार्सिलोनाला गेली. तिला डेंटिस्ट क्षेत्रात करिअर करता आले नाही, पण मॉडेलिंगमध्ये तिने नशीब आजमावले.मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केल्यानंतर,  तिने मेस्सीचा माजी सहकारी लुईस सुआरेझची पत्नी सोफिया बाल्बीसोबत एक बुटीक उघडला. अँटोनेलाचे सोशल मीडियावर 24.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.एंटोनेला आणि मेस्सीने 2017 मध्ये त्यांच्या गावी मोठ्या थाटामाटात लग्न केले. मेस्सी आणि त्याची पत्नी अँटोनेला हे थियागो, माटेओ आणि सिरो या तीन मुलांचे पालक आहेत.