‘आता काय स्वतः दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादी वाल्यांना की याचा राजीनामा घ्या म्हणून ?’

मुंबई – मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. ईडीच्या (ED) कारवाईविरोधात केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा (Nawab Malik) दावा चुकीचा असल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. ईडीनं केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.

नवाब मलिक यांची याचिका फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं. “याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,  या निर्णयानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्वीट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. ते म्हणाले, मुंबई हायकोर्टाने नवाब मलिकचा बेल अर्ज फेटाळला, आता काय स्वतः दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादी वाल्यांना की याचा राजीनामा घ्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.