FTII मध्ये बाबराचे उदात्तीकरण कशासाठी? रविंद्र पडवळ यांचा थेट सवाल 

FTII Babri Masjid Banner:  नुकताच अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir Pranpratishta) सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र एकीकडे अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे पुण्यात फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये  (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

एफटीआयआयमधील काही विद्यार्थ्यांनी बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पसमध्ये लावला. बाबरी पाडली जाणं म्हणजे संविधानाचा मृत्यू अशा आशयाचं वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर आक्षेप घेतला यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्ते रविंद्र पडवळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, फलकाविषयी माहिती मिळताच आम्ही सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते संस्थेत गेलो विद्यार्थ्यांनी अशा आशयाचे फलक लावून हिंदुत्वाचा आधि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अपमान केला आहे. विद्याथ्यांनी धार्मिक भावना दुखावण्याचे काम केले आहे म्हणून आम्ही संस्थेत गेलो, फलक फाडले आणि जाळले. आम्ही नव्हे तर प्रथम त्या विद्यार्थ्यांनीच आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दावा पडवळ यी केला.  सोबतच  FTII मध्ये बाबराचे उदात्तीकरण कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सुप्रीम कोर्टाचा अवमान  करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या