Jitendra Awhad | मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करून वेगळं करण्याचा सरकारचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

 Jitendra Awhad : विद्यमान सरकारकडून ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये ज्या प्रमाणात वाद निर्माण करून वेगवेगळे केले आहे त्याचप्रमाणे सरकारकडून मराठा आणि ओबीसी  यांना वेगवेगळे करण्याचं काम करत आहे याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांचे जे ओबीसी समाजासाठी योगदान आहे. ते कधीच कुणाला विसरता येणार नाही आहे. मंडळ आयोग आल्यानंतर सर्वात प्रथम देशामध्ये अंमलबजावणी कुणी केली असेल तर ती शरद पवार यांनी केली आहे. ओबीसी समाजाला २७% आरक्षण देण्याचं काम शरद पवार साहेब यांनी केले आहे. या आरक्षणामुळे आज महाराष्ट्रात कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर अनेक आयपीएस अधिकारी अशा विविध पदांवर आज आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेही नसलेला बंजारा, माळी, धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचा मोठ काम प्रस्थापित जातींच्या विरोधात जाऊन पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळे पवार साहेबांचे योगदान आहे जे ओबीसीच्या भल्यासाठी तेवढं कुणाचाच नाही आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सरकारच्या प्रतिनिधींनी ७५ वर्षांच्या भुजबळांना एकटं पाडलं इतर मंत्र्यांनी विरोध का केला नाही? असाही सवाल यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद झाले. भुजबळ हे शरद पवार  यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं बोलले ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही. दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबद्दल ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्या मंत्रिमंडळातील एका पक्षाचा आमदार ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी छगन भुजबळांबद्दल असं म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. हे असं म्हणणं असंवैधानिक आहे. ते या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. खरंतर त्यांनीपण हे मंत्रिमंडळातच बोललं पाहिजे. पण मंत्रिमंडळात ओबीसींची बाजू मांडायला कमी पडत आहेत, हे दिसतंय. त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमचं मत स्पष्ट आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. आम्हाला वाद घालायचे नाहीत. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की, आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो आहोत. आपण सर्व बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणं लागावीत ही बहुजनांची इच्छा आहे. कारण बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडं जाऊच शकत नाही. त्यामुळे बहुजनांना एका बाजूला काढा आणि मराठ्यांना एका बाजूला काढा अन् झुंजवत ठेवा. मिळतंय काय कोणाला ठेंगा. मराठा आरक्षणाच्या त्या सर्क्युलरमध्ये आहे की, सगेसोयऱ्यांना देखील कुणबीचे प्रमाणपत्र द्या, त्याच्यावर आव्हाड म्हणाले की, आता माझी बायको ब्राम्हण आहे. तर मग तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून प्रमाणपत्र देणार का? ते तर सगेसोयरे झाले ना माझ्या बायकोच्या मुलांना प्रमाणपत्र देणार का? असा सवालही यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मागासवर्गीय महिलेने सवर्णासोबत लग्न केले तर आईची जात लावण्यात यावी. आणि मराठा समाजाला सगेसोयरेप्रमाणे आरक्षण दिल्यास आमच्यासारख्या वंजारी समाजाला देखील सगेसोयरेप्रमाणे इतर जातीतील महिलांना देखील आरक्षण द्यावं अशीही मागणी यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा