देशात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदींचा शो – गांधी

Amruta Fadanvis – प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pranpratishtha) सोहळ्यानंतर, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिर आता सर्वांसाठी खुले झालं आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या सोहळ्याचे कौतुक होत आहे मात्र भारतातील विरोधकांना मात्र केवळ राजकीय विरोधच करण्यात रस असल्याचे दिसत आहे.

यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही नकारात्मक अशीच प्रतिक्रिया समोर आली आहे. देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट आली आहे. त्यासाठी तुम्ही कसे तयार आहात असं विचारलं असता, राहुल गांधी यांनी “रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदींचा शो होता. नरेंद्र मोदी यांनी फंक्शन केलं. ते सगळं ठीक आहे. आमच्याकडे देशाला बळ देणाऱ्या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत.” असं उत्तर दिलं आहे.

आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मतं आहेत. सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या