मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणार – रमेश बागवे

Maratha Reservation गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज स्वतंत्र्य आरक्षणाची मागणी करीत आहे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास निधी नाही, मातंग आयोगाच्या शिफारसी अजूनही लागू झाल्या नाहीत, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक असे विविध मातंग समाजाच्या विविधा प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे या प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मातंग एकता आंदोलन राज्यभर मोठा लढा उभारणार असल्याचे मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी आज जाहीर केले . मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता परिषद आयोजित केली होती त्यावेळी बागवे बोलत होते .

पुढे ते म्हणाले की, अनुसूचित जातीची व मातंग समाजाची जनगणना होणे अतिशय गरजेचे आहे .यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला मातंग एकता आंदोलनाचा पाठिंबा जाहीर केला.

या वेळी मातंग एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड ,कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे, राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, महिला अध्यक्षा राजश्री गायकवाड, सुरेखा खंडागळे, अरुण गायकवाड यासह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी