राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

Eknath Khadse Heart Attack: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना आज अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यापर्यंत हे वृत्त पोहोचताच त्यांनी तात्काळ एअर ऍम्ब्युलन्स पाठवत त्यांना जळगावहून मुंबईला उपचारासाठी आणले आहे. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) हिने मुख्यमंत्र्यांना कॉलद्वारे बातमी कळवली, ज्यानंतर शिंदेंनी तात्काळ सुत्रे हलवली आणि मदत पोहोचवली.

दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सची सोय केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण