WPL 2023 Prize Money : चँपियन मुंबई इंडियन्सला मिळाले ‘इतके’ कोटी, तर उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

मुंबई- महिला प्रीमियर लीग २०२३च्या अंतिम सामन्यात (WPL Final) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) ७ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा महाअंतिम सामना रंगला होता. हा सामना जिंकणारा संघ मालामाल झाला आहे. ट्रॉफी जिंकण्याबरोबरच मुंबई संघाने बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये जिंकले आहेत. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. (WPL Winner Prize Money)

आयपीएलच्या तुलनेत डब्ल्यूपीएलची उपलब्ध बक्षीस रक्कम खूपच कमी आहे. गेल्या वर्षी आयपीएल चॅम्पियन बनलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला १२.५ कोटी रुपयांचा धनादेश मिळाला होता.

उपविजेत्या संघांना किती?
पीएसएलमधील उपविजेत्या मुलतान सुलतान्सच्या संघाला 80 दशलक्ष पाकिस्तानी रुपये मिळाले आहेत. याचे भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केल्यास ते 2.3 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत महिला प्रीमियर लीगचा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्सला त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले.

WPL फायनलनंतर वितरित झालेल्या पुरस्कारांची यादी:
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द मॅच (ट्रॉफी आणि एक लाख रुपये): राधा यादव
सामनावीर (ट्रॉफी आणि २.५ लाख रुपये): नताली सायव्हर ब्रंट
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि रु ५ लाख): सोफी डिव्हाईन
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू (ट्रॉफी आणि ५ लाख रुपये): यास्तिका भाटिया
फेअरप्ले पुरस्कार: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स
कॅच ऑफ द सीझन पुरस्कार (ट्रॉफी आणि ५ लाख रुपये): हरमनप्रीत कौर
एका मोसमात सर्वाधिक विकेटसाठी पर्पल कॅप (कॅप आणि रु ५ लाख): हेली मॅथ्यूज
एका मोसमात सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅप (कॅप आणि रु ५  लाख): मेग लॅनिंग
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि ५ लाख रुपये): हीली मॅथ्यूज
उपविजेता संघ (ट्रॉफी आणि रु. ३ कोटी): दिल्ली कॅपिटल्स
विजेता संघ (ट्रॉफी आणि ६ कोटी रुपये): मुंबई इंडियन्स