सूरजच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पंढरपूर – राज्यातील शेतकरी विविध संकटांना तोंड देत सावरण्याचा प्रयत्न करत असताना वीज तोडणी करण्याचा सपाटा सरकारकडून लावण्यात आला आहे. यातच आता सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून पंढरपूर तालुक्यात एकाने आत्महत्या केली आहे.

मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. वीज तोडणी, मोगलाई पद्धतीची जादा वीजबिल आकारणी या सर्वांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर करून आपलं जीवन संपवलं. राज्यातील सत्ताधारी बसता-उठता शिवाजी महाराजांचे नाव घेतात मात्र सरकारचा एकंदरीत कारभार पाहता राज्यात शिवशाही नव्हे तर मोगलाई सुरु आहे का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर आता भाजपने राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. तिर्थक्षेत्र पंढरपुर विठठलाचा दरबारात सुरज जाधव नावाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली हे दुर्दैव आहे. पण सरकारने हा घेतलेला बळी असून विज पुरवठा बंद पण सक्तीची विज वसुली त्याला वैतागून हे पाऊल शेतकरी उचलत आहेत .या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असून ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.